ट्रेलरच्या धडकेत 1 ठार

0

लोणी काळभोर : दुचाकीवरून लग्नाला जाणार्‍या वडील व मुलाला मागून भरधाव आलेल्या ट्रेलरने जोरात धडक दिल्याची घटना हडपसर-सासवड राज्यमार्गावर घडली. या अपघातात मुलगा मृत्यूमुखी पडला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. दिपक उत्तम तुपे (वय 49) असे मृताचे नाव असून उत्तम साधू तुपे (वय 78) हे गंभीर जखमी झाले आहेत. दिपक आणि त्यांचे वडील उत्तम तुपे हे शनिवार सायंकाळी दुचाकीवरून एका विवाह समारंभासाठी ऊरूळी देवाची येथे जात होते. हॉटेल सोनाई समोर आले असता त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने आलेल्या बाराचाकी ट्रेलरने धडक दिली. यामुळे दुचाकी वरील पिता-पुत्र दोघेही गंभीर जखमी झाले. हडपसर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना दिपक यांचा मृत्यू झाला.