कात्रज । मारुती ऑल्टो कारला धडक देऊन कंटेनर ट्रेलर दरीत कोसळल्याची घटना कात्रज घाटातील भिलारेवाडी येथील तीव्र वळणावर घडली. यात मारुती ऑल्टोचालक जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
गणेश राजन लद्दे व त्याचा मित्र प्रमोद नवनाथ देवकाते मारुती ऑल्टोमधून भिलारेवाडी येथे पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. कात्रज घाटातून पुण्याच्या दिशेने येणार्या कंटेनर ट्रेलरचा चालक दादा शिवाजी औताडे याचा उतारावरून भरधाव येताना गाडीवरील ताबा सुटला. त्याने ऑल्टालो जोरदार धडक दिली. यात देवकाते गंभीर जखमी झाला असून गणेश किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरिक्षक दत्तात्रय मदने व पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कंटेनर ट्रेलर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील मदने करीत आहेत.