नवी दिल्ली । गोलंदाज इरफान पठाणने आपली पत्नी सैफा बैगसोबत असलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला. परंतु, नेटिझन्सा फोटोमधील एक गोष्ट खटकली आणि यावरून ट्विटरवर इरफानला ट्रोल करण्यास सुरूवात केली. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणार्या इरफानने टीकाकरांना आपल्या शैलीत उत्तर दिले. यावेळी त्याने नेटिझन्सना आपल्या उत्तराने चिमटाच काढला.
इरफान पठाणने पत्नीसोबत फोटो शेअर केल्यानंतर नखांना लावलेलं नेलपॉलिश, अर्धवट झाकलेले हात यामुळे त्याच्या चाहत्यांनी ट्रोल केले होते. तू पठाण आहेस, आणि एका पठाणाने आपल्या पत्नीसोबतचे असे फोटो टाकणे गैर असल्याचे इरफानच्या चाहत्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरले होते. काहीजणांनी तर हे सर्व इस्लामविरोधी असल्याचे सांगितले.मात्र इरफान पठाणने टिकाकारांना आपल्या शैलीत उत्तर देत शांत केले.