बॉलिवूडची बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने टॉपलेस फोटोशूट कॉस्मोपॉलिटीन इंडिया मॅगझिनच्या नव्या अंकासाठी केले. त्यानंतर जॅकलिनने हे फोटो सोशल मिडियात व्हायरल केले. परंतु जॅकलिनने जसे हे फोटो इन्स्टाग्राफमध्ये शेयर केले. तसे अनेकांनी त्यावर ट्रोल करणे सुरू केेेले. असे फोटोशूट करणारी जॅकलिन ही काही पहिली अभिनेत्री नाही. मात्र इतर अभिनेत्रींप्रमाणे जॅकलिनने गप्प बसणे पसंत केले नाही. याआधी दीपिका पादुकोण हीने असे फोटोशूट केले होते. तेव्हाही तिला लक्ष्य करण्यात आले होते. दीपिकानेही मॅगजिनसाठीच असे फोटोशूट केले होते. जॅकलिन यावेळी डेनिमची जीन्स घातली होती आणि वरती टॉपलेस होती. या फोटोला काही जणांनी पसंत केले, तर काही जणांनी विरोध केला. त्यावेळी तिने आणखी एक टॉपलेस फोटो शेयर करून मी काही गुलाबाचे फूल नाही, ज्याच्या सौंदर्यासाठी तोडले जाते, त्यानंतर फेकून दिले जाते, अशा शब्दांत टिकाकारांचा समाचार घेतला.