ट्वीटरवरुन बिंद्राने कोहलीवर साधला निशाणा

0

मुंबई । चॅम्पियन ट्रॉफीच्या काळात अनिल कुंबळे व कर्णधार विराट कोहली यांच्यातील वाद समोर आले. या वादांचा अंत कुंबळे याने राजीनामा देऊन केला. कुंबळे यांने राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून कोहलीवर नाराजी व्यक्त केली. यात भारताचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता माजी नेमबाज अभिनव बिंद्राची भर पडली आहे. अभिनव बिंद्राने आपल्या ट्वीटर हँडलवर एक सूचक ट्विट टाकत प्रशिक्षक अनिल कुंबळेला आपला पाठींबा जाहीर केलाय. उवे रेस्टरर हे माझे प्रशिक्षक होते.

त्याच्या प्रशिक्षकांचा संबंधी सांगितले
मला त्यांचा नेहमी राग यायचा. ज्या गोष्टी मला ऐकायला आवडायच्या नाहीत, त्याच गोष्टी ते मला सांगायचे. पण तरीही 20 वर्ष मी त्यांच्यासोबत कायम राहिलो.असे उदाहरणासह अभिनव आपला अनुभव कथित केला.या ट्विटमध्ये बिंद्राने कोणाचे नाव जरी घेतले नसले तरी सर्व रोख हा विराटकडे आहे. कुंबळेंनी राजीनामा दिल्यानंतर सध्या वेस्ट इंडिज दौर्‍यात भारतीय संघ मुख्य प्रशिक्षकाशिवाय खेळणार आहे.

संजय बांगर हे संघाचे फलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय आर.श्रीधर हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक तर एम.व्ही.श्रीधर हे संघाचे मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे कुंबळेंनंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक कोण होणार याची उत्सुकता सर्व भारतीय क्रीडा रसिकांना लागलेली आहे.