ट्वेन्टी-२० : न्यूझीलंडची तुफानी फटकेबाजी; भारतासमोर २०४ धावांचे आव्हान

0

ऑकलंड: भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी केली. या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडला भारतापुढे २०४ धावांचे आव्हान ठेवता आले. पहिल्या सामन्यात फलंदाजी करत असताना न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरुवात केली.