उपसूचना कळून दिल्या जात नाहीत
पिंपरी : कामे करताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. ठराविक नगरसेवकांच्या प्रभागातच विकास कामे केली जातात. उपसूचनांच्या कागदावर काही लिहिले आहे. हे शिक्षिका असूनही मला कळत नाही, सत्ताधारी भाजपला असा घरचा आहेर, भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी दिला आहे. तसेच प्रत्येक नगरसेवकाला समान न्याय देण्याची गरज असून बोलणार्यांचे तोंड दिसते असेही त्या म्हणाल्या.
विश्वासात घेतले जात नाही
वर्गीकरणाच्या 258 कोटी रुपयांच्या विषयाला उपसूचनांसह बुधवारी झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस सुरु आहे. वारंवार ही धूसफूस बाहेर येत आहे. महासभेत बोलताना भाजपच्या प्रियंका बारसे म्हणाल्या, आम्हाला विश्वासात घेऊन वर्गीकरणाचे प्रस्ताव आणले आहेत का? आम्हाला विश्वासात का? घेतले नाही. केवळ ठराविक नगरसेवकांच्याच प्रभागात कामे केली जातात. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे.