तळोदा । तालुक्यातील मालदा गावात सुरु असलेल्या अवैध दारु विक्रीची दुकाने बंदी करण्यासाठीचा ठराव करून तसेच विविध समस्यांच्या निवेदनाची प्रत पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे यांना देण्यात आली. तसेच ठराव होऊनही दारू विक्री होत असल्याने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तळोदा तालुक्यातील मालदा येथील ग्रामस्थांनी दारूबंदीचा निर्णय घेतला आहे. याकरिता 1 मे रोजी ग्रामपंचायतीत ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. तरी गावात ठिकठिकाणी अद्याप ही अवैध दारू विक्री होत असल्याने, गामस्थानी पोलीस निरीक्षक संजय भामरे यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात गावात ठिकठिकाणी दारूचे अवैधरित्या विक्री मोठा प्रमाणात होत आहे. त्यामुळे गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत नागरिक दारूच्या आहारी जात आहेत. कोवळ्या वयातील मुलेही दारूच्या व्यसनाकडे वळत असल्याने त्यांचे भविष्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. दारूमुळे महिला वर्गालाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावात भांडण तंटे होत आहेत. दारू पिण्यामुळे अनेक संसार उध्वस्त झाले असुन दारूमुळे परिसरातील अनेक तरुणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेत वाढ होत आहे.
गावात दारूबंदी होणे अत्यावशक्य अवैध दारू विक्रीमुळे गावाचे वातावरण दूषित होत आहे. याकरिता गावात दारूबंदी होणे अत्यावशक्य झाले आहे. याकरिता 1 मे महाराष्ट्र दिनी गावातील नागरिक ग्रामरक्षक दल, ग्रामसेवक डी. सी. बच्छाव आणि ग्रामपंचायत सदस्यांनी मिळून गावात दारूबंदीचा ठराव केला आहे. ठराव होऊन गाव एकवटूनही आद्यप ही ठिकठिकाणी अवैद्य दारू विक्री होत असल्याने ते तात्काळ बंद करा अशी मागणी करत पोलीस उपनिरीक्षक पंकज शेवाळे यांना मालदयाचे ग्राम रक्षक दलाचे अधक्ष गोपी पावरा, मेहरबान खर्डे, विजय खर्डे, दत्तू खर्डे, लकी खर्डे, प्रकाश खर्डे, अशोक खडै आदींनी निवेदन दिले आहे. सदर निवेदनावर अशोक खर्डे, जयराम पावरा, राकेश खर्डे, सुभाष पवार, कौशल्ययाबाई पवार, कुंतीबाई खर्डे, करुणा पवार, अण्णा नावडे, मंगल रावसाळे आदींसह 190 पेक्षा अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत. पोलीस यावर काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.