मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘ठाकरे’ सिनेमा कधी येणार याबाबत रसिकांमध्ये उत्सुकता आहे. सिनेमाचा पहिला टीझर लॉन्च झाल्यापासूनच ठाकरे सिनेमाची रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर आज मोठ्या उत्साहात या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ट्रेलर लाँच करण्यात आले. यावेळी मुख्य अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव, खासदार संजय राऊत आदी उपस्थित होते.
चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतले आहे. त्यामुळे यातील काही दृश्यांना कात्री लागली आहे.
अभिजीत पानसे दिग्दर्शित आणि खासदार संजय राऊत निर्मित हा चित्रपट आहे. मुख्य भूमिकेत नवाजउद्दीन सिद्दीकी आहे. मीनाताई ठाकरे यांच्या भूमिकेत अमृता राव आहे.