ठाकरे चित्रपटाचे पोस्टर इंग्रजीत

0

मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा आक्षेप

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर येत असलेल्या ठाकरे या चित्रपटाच्या पोस्टरवरून वाद सुरू झाला आहे. या चित्रपटाच्या इंग्रजी भाषेतील पोस्टरला मराठी अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावर तरडे यांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर आक्षेप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत ठाकरे चित्रपटाचा मुंबईत नुकताच टीझर व पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले होते. दरम्यान, तरडे यांनी ठाकरे चित्रपटाच्या इंग्रजी पोस्टरवरून मराठीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तरडे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

देऊळ बंद वर सेनेने घेतला होता आक्षेप
ठाकरे चित्रपटाच्या इंग्रजी पोस्टर बाबत प्रवीण तरडे यांनी म्हटले आहे की, माझ्या देऊळ बंद या चित्रपटाचे पोस्टर मी इंग्रजीत केले म्हणून शिवसेनेच्या काही मान्यवर नेत्यांनी मला फोन करून पोस्टर मराठीत करायला सांगितले. मी त्यांचे ऐकलेही होते. आता ठाकरे चित्रपटाच्या पोस्टरचे शिवसेना काय करणार, असा प्रश्न तरडे यांनी विचारला आहे.