मुंबई : ‘ठाकरे’ हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर चित्रपट असणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची व्यक्तीरेखा साकारत आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हिंदीत नवाजुद्दीनचा आणि मराठीमध्ये सचिन खेडेकरांचा आवाज वापरण्यात आलाय. खेडेकरांचा आवाज प्रेक्षकांनी चटकन ओळखला आणि नाराजीचा सूर लावला. आता जाहिरात आणि सिनेक्षेत्रात आपल्या आवाजाने सर्वांना चकित करणारे डबींग आर्टीस्ट चेतन शशीतल यांच्या आवाजाची मागणी प्रेक्षकांनी केली आहे.