ठाकरे सरकारमधील आणखी एका मोठ्या मंत्र्याला कोरोनाची लागण

0

मुंबई: ठाकरे सरकारमधील डझनभर मंत्री कोरोनाबाधित झाले आहेत. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ते आले होते, मात्र मंत्रिमंडळ बैठक सुरु होण्यापूर्वी त्यांचा रिपोर्ट आला. त्यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील ते १६ वे मंत्री आहेत.

चार दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघांवर उपचार सुरु असतांनाच आज दिलीप वळसे पाटील यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.