मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ६ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. काल सोमवारी नवनियुक्त मंत्र्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आज सर्व मंत्र्यांना कार्यालयीन दालनाचे वाटप करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहाव्या मजल्यावरील ६०१ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांना तिसऱ्या मजल्यावरील ३०२-३०७ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे. सुभास देसाई यांना ५ व्या मजल्यावरील ५०२, जयंत पाटील यांना ६ व्या मजल्यावरील ६०७, छगन भुजबळ यांना दुसऱ्या मजल्यावरील २०२, बाळासाहेब थोरात पहिल्या मजल्यावरील १०८, डॉ.नितीन राऊत ४ थ्या मजल्यावरील ४०२ क्रमांकाचे दालन देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर शिवसेनेचा झेंडा फडकेला असा विश्वास व्यक्त केला होता. अखेर मुख्यमंत्री शिवसेनेचे झाले असून ६ व्या मजल्यावर ताबा मिळविला आहे.