मुंबई: राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आहे. तीनही पक्षाचे विचार वेगवेगळे आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे बोलेले जात आहे. ‘ठाकरे’सरकार फार काळ टिकणार नाही असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले आहे.
ज्या सरकारमध्ये एकोपा नाही, एकमेकांना विचारलं जात नाही त्यामुळे हे सरकार फारकाळ टिकेल असे मला वाटत नाही असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी हे विधान केले आहे.
मुख्यमंत्री फक्त टीव्हीवरच दिसता
राज्य केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे, केंद्र राज्य सरकारला दोषी ठरवीत आहे. पण लोकांना याविषयी घेणे देणे नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा, असेही राज ठाकरेंनी सांगितले. ‘मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केले पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरूवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावेस वाटत नाही,” असे ते यावेळी म्हणाले.