मुंबई: सध्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेत ट्वीटर वॉर सुरु आहे. अमृता फडणवीस यांनी ट्वीटर वॉर छेडले. त्यानंतर शिवसेनेकडून त्यावर टीका झाली. दरम्यान आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना पत्नीच्या आग्रहाखातीर राज्यातील पोलिसांची वेतन खाती अॅक्सिस बँकेकडे वर्ग केल्याचे आरोप होत होते. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांचे सरकार फडणवीस सरकारचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बदलणार असल्याचे बोलले जात होते. साधारण दोन लाख पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन खाती अॅक्सिस बँकेतून पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीय बँकेत वर्ग करण्यात येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा निर्णय झाल्यास अॅक्सिस बँकेचे मोठे नुकसान होणार आहे.