जळगाव : आदिवासी ठाकूर जमातीतील आदिम अनुसुचीत ठाकूर जमात मंडळांची जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी अभिनव शाळेत बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष म्हणून पुंडलिक नारायण ठाकूर यांची निवड करण्यात आली. बैठकीला राज्यस्तरीय कार्यकारिणीचे अध्यक्ष ए.पी.ठाकूर, कार्याध्यक्ष दरबारसिंग ठाकूर, उपाध्यक्ष सुदाम ठाकूर, वासुदेव ठाकूर, विजय ठाकूर अनिल ठाकूर यांची उपस्थित होती.
निवडण्यात आलेली कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी संजय ठाकूर, उपाध्यक्ष अमरनाथ ठाकूर, सचिव शैलेंद्र ठाकूर, सहसचिव राजेंद्र ठाकूर, सेक्रेटरी राहुल ठाकूर, कोषाध्यक्ष नरेंद्र ठाकूर, सहकोषाध्यक्ष मुरलीधर ठाकूर, प्रसिद्धिप्रमुख रुपेश ठाकूर तर सदस्य म्हणून डॉ. अभिषेक ठाकूर, डॉ. प्रमोद ठाकूर, राजेंद्र ठाकूर, कैलास ठाकूर, संतोष ठाकूर, शालीग्राम पवार, प्रमोद ठाकूर, विजय पवार यांची निवड करण्यात आली. या वेळी राज्य अध्यक्ष ए. पी. ठाकूर यांनी नवनिर्वाचित जिल्हा पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले.