‘ठाकूर और मैं’ एकपात्री प्रयोग सादरीकरण

0

भुसावळ । खान्देशचा सुपुत्र नाट्यलेखक तथा दिग्दर्शक आणि विशेष म्हणजे आपल्या आईचे नाव आपल्या नावापुढे जोडणारा कलाकार नितीन शकुंतला धनराज वाघ हे बुधवार 15 रोजी भुसावळात तीन ठिकाणी ‘ठाकूर और मैं’ हा एकपात्री प्रयोग सादर करणार आहेत. स्वामी विवेकानंद व स्वामी रामकृष्ण परमहंस या गुरूशिष्याच्या नात्यावर आधारित हे एकलनाट्य तथा एकपात्री प्रयोग सकाळी 9 वाजता नाहाटा महाविद्यालय, दुपारी 3 वाजता जैन सोशल गृपतर्फे ओसवाल पंचायती वाडा आणि त्याच ठिकाणी सायंकाळी 7 वाजता ज्ञानासह मनोरंजन हाच हेतू गृपतर्फे सादर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त
भारतात पहिल्यांदाच मराठीमध्ये यु-ट्यूबवर ‘द डायरी ऑफ सायको’ ही वेब सिरीज बनविण्याचा बहुमान वाघ यांनी पटकावला असून ‘ठाकूर और मैं’ हे हिंदी एकलनाट्य महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आहे. एकपात्री नाट्य प्रयोगाचा लाभ घेण्याचे आवाहन नाहाटा महाविद्यालयातर्फे प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे, जैन सोशल गृपतर्फे प्रशांत कोटेचा तर ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.