ठाणेपाडा घाटावर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली

नंदुरबार ( प्रतिनिधी ) तालुक्यातील ठाणेपाडा घाट रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉली उलटून अपघात झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांच्या मदतीने वाहनांसाठी हा रस्ता मोकळा करण्यात आला.

नंदुरबार साक्री रस्त्यावर असलेल्या ठाणेपाडा येथील अवघड घाट खूपच घोकेदायक आहे. रस्ता अरुंद असल्याने घाटावर दोन वाहने चालण्यास जिकरीचे जाते. सोमवारी दुपारी याच ठिकाणी लोखंडी सळईची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. त्यामुळे या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे काही नागरिकांनी पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य केले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.