मुरबाड । मुरबाडमधील कुणबी समाज हॉल यथे ठाणे जिल्हा एकता मंच तर्फे मुरबाडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक निकाह सोहळ्या मध्ये सात जोडप्यांचा निकाह संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथोरे उपस्थित होते.विवाह म्हटला की मानपान खरेदी या गोष्टीनच वधू पिता मेटाकुटीला येतो. त्यातच त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर खर्चाच्या ओझ्याने तो पूर्ण खचून जातो. लग्नाच्या खर्चापायी येथील शेतकरी जमीन विकून भूमिहीन झाल्याचे पहाव्यास मिळते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन हुंडा मानपान अनिष्ठ रूढी परंपरांना फाटा देत ठाणे जिल्हा एकता मंचने मुरबाडमध्ये मुस्लिम समाजाच्या सामुदायिक निकाहाच्या माध्यमातून चौदा कुटुंबियांना दिलासा दिला आहे.
ठाणे जिल्हा एकता मंचाचे अध्यक्ष अब्बास शेख, कार्याध्यक्ष इकबाल शेख आयोजित या निकाह सोहळ्यात मंडप वर्हाडीना जेवण वधू वरांना भेट वस्तू देण्यात आल्या. याशिवाय वधू वरांच्या घरापासून मुरबाड येथील लग्न मंडपाच्या हॉल पर्यंत जाण्या येण्याचा सर्व खर्च एकता मंचाने केला. हा निकाह सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी मतीन शेख सलीम शेख आरिफ मणियार राजेश तळवडे उमेश गायकवाड इत्यादी कार्यकर्त्यांनी सोहळ्या साठी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झुंजारराव सर यांनी केले. ठाणे जिल्हा एकता मंचातर्फे तालुक्यातील दुर्गम भागात डोळे तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित केली जातात. अत्याविधीचे साहित्यही दिले जात असल्याची माहिती कार्याध्यक्ष इकबाल शेख यांनी दिली एकता मंच हिंदू मुस्लीम समाजासाठी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.