किन्हवली । भाजपच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या उपाध्यक्षपदी सुरेश अण्णा विशे यांची निवड करण्यात आली असून त्यांना शहापूर येथील एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सुरेश विशे हे किन्हवलीचे रहिवासी असून 2002 ते 2005 या काळात ते भाजपचे शहापूर तालुका अध्यक्ष होते. संत गजानन महाराज बिगरशेती सह.पतपेढी किन्हवलीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भाजपचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, ठाणे-पालघर विभाग, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष व माजी जि.प.सदस्य अशोक इरनक, शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शिंदे, जिल्हा सरचिटणीस रवी चंदे, महिला तालुकाध्यक्ष निशीगंधा बोंबे व भाजपा पदाधिकारी आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.