ठाणे महापालिका सहा.आयुक्तांवरील हल्ल्याचा सावद्यात निषेध

सावदा : ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सावदा शहरातील पालिका कर्मचार्‍यांनी निषेध नोंदवला. फेरी विक्रेत्याच्या हल्ल्यात पिंपळे यांच्या हाताची बोटे कापली गेलीतसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणार्‍या एका महिला अधिकार्‍यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणार्‍या अधिकार्‍यांवर हल्ले करतात त्यामुळे भ्याड हल्ल्याने अधिकारीच नव्हे तर संपूर्ण संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होत अल्यने अशा हल्ल्यांचा संघटीत होवून निषेध करणे व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय असल्याने कर्मचार्‍यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. हल्ल्याचा निषेधार्थ कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून काम बंद (अत्यावश्यक सेवा वगळून) आंदोलन केले. फैजपूर प्रांताधिकार्‍यांनादेखील निवेदन देण्यात आले.

या कर्मचार्‍यांचा आंदोलनात सहभाग
यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, कार्यालय निरीक्षक सचिन चोळके, आरोग्य विभाग प्रमुख, महेश चौधरी, बांधकाम विभाग धनराज राणे, अविनाश गवळे, वसूली विभाग आहूजा, किरण चौधरी, लेखा विभाग भारती पाटिल, विमलेश जैन व कर्मचारी सहभागी झाले.