ठाणे । ठाणे महापालिका आयोजित ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला यवेळीही धावपटूंचा उस्फुर्त सहभाग लाभला आहे . 28 वे वर्ष असलेल्या या स्पर्धेत यावेळी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील धावपटूंसह एकुण 20 हजार धावपटू सहभागी होणार आहेत. त्यामध्ये नाशिक येथून रिशु सिंग, आरती पाटील या महिला खेळाडू व नरेंद्र प्रताप आणि पिंटू यादव आदी खेळाडूंचा समावेश आहे.
तसेच आर्मी सर्व्हिस ऑफ इंडिया-पुणे, बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप आर्मी, उरण, सातारा, सांगली येथील धावपटू आव्हान देतील. सदर स्पर्धा विविध दहा गटांत घेण्यातयेणार आहे. पहिल् या गटातील स्पर्धा महाराष्ट्र राज्य स्तरावर पुरुषांसाठी असून तिचे अंतर 21किमी असेल. या गटातील विजेत्यांसाठी पहिले पारितोषीक 75 हजार, दुसरे बक्षिस 45हजार, तिसरे बक्षिस 30 हजार रुपयांचे आहे. दुसरा मुख्य गट हा 18 वर्षावरी मुलांसाठीचा असून ही स्पर्धा 10 किमी अंतराचीआहे. या गटातील पहिल्या ते चौथ्याविजेत्यांसाठी अनुक्रमे 15 हजार, 12हजार, 10 हजार आणि 7,500 अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तिसरा गट महिलांचा असून ही स्पर्धा 15 किमी अंतराची आहे.