ठाणे | रिओ दि जनेरिओ, ब्राझील येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलंपियाड स्पर्धेत भारतीय वंशाच्या ठाणेकर तनिश प्रशांत पाटील “हॉल ऑफ फेम”चा मानकरी ठरला. त्याने या स्पर्धेत स्वित्झर्लंडचे प्रतिनिधित्व करताना 15 गुणांची कमाई केली.
चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पूर्व) येथील वाल्मिकीनगर सोसायटीचे ज्येष्ठ रहिवाशी चारुदत्त सदानंद ठाणकर यांचा तनिश हा नातू आहे. मोरेकर गणित अभ्यासिकेचे हरेश्वर मोरेकर यांनी तनिशचे अभिनंदन करताना म्हटले की, जागतिक गणित ऑलंम्पियाड स्पर्धेत एक ठाणेकर चमकला याचा मला अभिमान वाटतो.