ठाण्याच्या गांवदेवी मैदानात तब्बल १८ हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी

0

ठाणे : मराठी नववर्षाच स्वागत करण्यासाठी ठाणेकर सज्ज झाले आहेत. ठाण्याची बाजारपेठ देखील गुढीपाडवा साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. यानिमित्ताने मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रंगरसीक परिवाराने गांवदेवी मैदानावर साकारलेली १८ हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.

महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी या भव्य रांगोळीचं उदघाटन पार पडले. ही भव्य रांगोळी काढण्यासाठी सुमारे आठ तासापेक्षा अधिक वेळ लागला. या रांगोळीसाठी ८०० किलो रांगोळी आणी ८०० किलो रंगाचा वापर करण्यात असून या रांगोळीत रंगांच्या १३ छटा दिसून येतात. संपूर्ण विश्वाची निर्मीती ब्रहतत्वातून झाली.निर्गुण निराकार अशा ब्रम्हांचे सगुण रुप आपल्याला ऊँ कार हया ध्वनीतून अनुभवता येतो. अशा या ऊँ काराचे चित्रण सदर रांगोळीतून साकारण्यात आले आहे. तसेच विविध पारंपारीक चिन्ह आणि अलंकारीक आकृत्या यांचा या रांगोळीत वापर करण्यात आला आहे. विविध पारंपारीक चिन्ह, गोपदम, केंन्द्रवर्धिनी, अर्धवर्तुळ, रेषा आणि अलंकारीक आकृत्या यांच्या सहाय्याने रंगरसीक परिवारातील वेदव्यास कटटी यांच्या संकल्पनेतुन १०० कलाकारांनी ही भव्य रांगोळी साकारली आहे.