धुळे- मानसिक आजाराच्या उपचारासाठी धुळ्यातील एका गतिमंद तरुणीला ठाणे येथील मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन वर्षांच्या उपचारानंतर तरुणीला कुटुंबियांनी धुळ्यात घरी आणले होते. तरुणींच्या शारीरीक बदलामुळे तिच्या आईच्या मनात शंका निर्माण झाली. तरुणीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता. ती 10 आठवडे 5 दिवसांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ठाण्यातील रुग्णालयात हा प्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे. धुळ्यात याप्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यातील पारोळा रोडवरील परिसरात रहिवासी असलेल्या एक महिलेने आझादनगर पोलीस दिलेल्या फिर्यादीनुसार महिनेची 23 वर्षीय मुलगी गतीमंद असल्याने 11 जुलै 2013 पासून तिला उपचारासाठी ठाण्यातील प्रादेशीक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तिला आईने 12 सप्टेंबर 2018 रोजी धुळे येथील घरी घेवून आली होती. गतीमंद मुलीच्या शारिरीक बदलामुळे तिच्या आईच्या मनात शंका आली. त्यामुळे पीडीतेच्या आईने जिल्हा रुग्णालयात गाठले. रुग्णालयात तपासणी केली असता पीडीत तरुणी 10 आठवडे पाच दिवसांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. ठाण्यातील रुग्णाालयात उपचार घेत असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी शहरातील आझादनगर पोलिसात भादंवि कलम 376 प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.