ठाणे । चाळीसगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व इतर लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या अपमानस्पद वागणुकीच्या निषेधार्थ 3 नोव्हेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व गट 1 व 2 च्या अधिकारी वर्गाने लेखणी बंद करून काम बंद आंदोलन केले. या घटनेसाठी जबाबदार लोकांना त्वरित अटक करून, कायद्यानुसार त्यांना कडक शिक्षा व्हावी तसेच यापुढे कोणत्याही अधिकार्यावर कर्तव्य पालन करीत असताना असा प्रसंग ओढवू नये यासाठी कायद्यातील तरतुदी आणखी कडक व्हाव्यात अशा स्वरुपाची मागणीही महाराष्ट्र विकास सेवा संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली.
अधिकार्यांचा सहभाग
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पाटील, प्रकल्प संचालक डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) चंद्रकांत पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. प) डी. वाय. जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) मानसी बोरकर, गट विकास अधिकारी मुरबाड ई. ए. हश्मी, गट विकास अधिकारी कल्याण श्वेता पालवे, गट विकास अधिकारी शहापूर सुशांत पाटील, गट विकास अधिकारी भिवंडी अविनाश मोहिते, गट विकास अधिकारी अंबरनाथ अ.व्ही .सोनटक्के, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (रोजगार) एच. डी. दोडके, आदी अधिकारीवर्ग या आंदोलनात सहभागी झाले होते.