ठाणे : ठाण्यात कोकण कला अकादमी, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय व मुग्धा चिटणीस-घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर शालेय व अंतर महाविद्यालयीन (कनिष्ठ व ज्येष्ठ महाविद्यालय) कोकण विभागीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेत शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्यांमार्फत प्रत्येक संस्थेने प्रत्येक गटात फक्त एक विद्यार्थी प्रत्येकी 25 रुपये प्रवेश मूल्यासह स्पर्धेसाठी पाठवावा. स्पर्धा आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालय, रघुनाथनगर ठाणे येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल. पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा संपताच 5.30 वा. आयोजित केला जाईल. या स्पर्धेत सहभागी होणार्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यास रुपये 2500, द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यास रुपये 1500 आणि आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यास रुपये 1000 पारितोषिके दिली जातील आणि प्रथम क्रमांक मिळविणार्या विद्यार्थ्याच्या शाळा-महाविद्यालयास कायम स्वरुपाचा चषक दिला जाईल. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 7 ऑगस्ट 2017 आहे.