ठाण्यात कोकण विकास मंचचा एल्गार

0

ठाणे: ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभाजन करून पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निर्मिती करावी, शैक्षणिक पात्रता, जात, संवर्ग, वय व एकूण सेवा या निकषांच्या आधारे पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना नियमबाह्य पद्धतीने दिलेली पदोन्नती रद्द करावी व संचालक मंडळ आणि व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई करावी, संचालक व व्यवस्थापक यांचे जे नातेवाईक बँकेची नोकरी करीत आहेत, त्यांना तात्काळ निलंबित करावे. बँकेची नोकरभरती आयबीपीएस पद्धतीनेच करावी आणि त्रयस्थ संस्थेमार्फत ऑनलाईन अंमलात आणावी, बँकेने जास्त दराने खरेदी केलेली मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करावे, बाजारभावापेक्षा जास्त दराने खरेदी केलेल्या साहित्याचे लेखा समितीकडून ऑडीट करावे, शेतकर्यांना तात्काळ मिळणारी दहा हजार रुपये रक्कम त्वरित वाटप करावी, सर्वभागधारकांना शेअर्स सर्टिफिकेट मिळावेत, जाचक अटी रद्द करून शेतकर्यांसाठी कर्जप्राक्रिया सुलभ करण्यात यावी, बँकेकडून विनाकारण होणारा वाहन खर्च टाळण्याबाबत कारवाई करावी या मागण्यांसह मनोर-वाडा-भिवंडी रस्त्याबाबतच्या मागण्यांसह शुक्रवारी कोकण विकास मंचच्या पुढाकाराने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.