ठाण्यात मतदार नोंदणी

0

ठाणे : ठाणे जिल्ह्यात 3 लाख नवे मतदार नोंदणीचे उद्दिष्ट्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेषत: महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यासाठी लक्ष्य केले आहे. आज नवीन मतदार नोंदणीच्या झालेल्या कार्यक्रमास विभागीय आयुक्त जगदीश पाटील, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतासारख्या लोकशाही देशाने मतदानाची कमी टक्केवारी गांभीर्याने घेतली पाहिजे असे सांगून विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील म्हणाले की निवडणुकीच्या वेळची सुटी एन्जाँय न करता जबाबदारीने मतदानाचा आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचा संकल्प केला पाहिजे. भारताच्या भविष्याच पसायदान ज्ञानेश्वरांनी आपल्या ओवीतून मांडले आहे. संपूर्ण जगात लोकशाही प्रकियेत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचे काम मतदारांचे असते. त्यासाठी 100 टक्के पात्र व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदविलेच पाहिजे. असे झाले तर पुढील 5 वर्षे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वाची ठरतील असा विश्वास आयुक्त पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.