ठाणे । गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा ठाण्यात दादागिरी बघायला मिळाली आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्यानंतर आता ठाणे शहर मनसेने शहरातील परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मच्छी विकण्याचा व्यवसाय कोळी बांधवांचा आहे. परंतु त्यांना व्यवसाय न करू देता घरोघरी जाऊन मच्छीविक्री करणार्या परप्रांतीयांना मनसेने लक्ष केले आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील विविध भागात मासे विक्रीचा व्यवसाय करणार्या परप्रांतियांना मनसे स्टाईलने बेदम चोप दिला. कोलबाड परिसरात परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना मारहाण करण्यात आली. इथे स्थायिक असणार्या कोळी समाजाला आणि मराठी माणसालाच इथे मासे विक्रीचा हक्क आहे, असे सांगत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.
कोलबाड परिसरातील रस्त्यांवर अनेक मच्छी विक्रेते बसतात. एक रांगेत जवळपास 20 ते 25 मच्छी विक्रेते बसतात. यातील बहुतेक मच्छी विक्रेते हे परप्रांतीय आहेत, असा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. कोलबाड परिसरातील आग्री आणि कोळी समाजातील मोठ्या प्रमाणात मासे विक्रेत्यांना परप्रांतीयांकडून नाहक त्रास होत आहे. मासे विक्री करणार्या आगरी कोळी बांधवांना परप्रांतिय मासे विक्री करणार्यामुळे त्रास होत असल्याची आणि त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार मनसेकडे प्राप्त झाली होती. त्यामुळे ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मासे विक्री करणार्यांना मनसे स्टाईलने चोप दिला आहे. तर आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून या ठिकाणच्या परिसरातील परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मनसे कार्यकर्त्यांकडून पळवून लावण्यात आले आहे. कोळी समाज आणि मराठी माणसालाच महाराष्ट्रात मासे विकण्याचा हक्क मिळाला पाहिजे, असे कार्यकर्त्यांनी यावेळी ठणकावले. पदपथावर बसून व्यवसाय करण्याचा हक्क हा मराठी माणसाचाच असल्याचा दावा त्यांनी केला होता. तोच धागा पकडून, ठाण्यातील मनसैनिकांनी शुक्रवारी कोलबाड येथे परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मारहाण करत हाकलून लावण्यात आले. त्यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भविष्यातदेखील फेरीवाल्याच्या विरोधात आंदोलन सुरूच रहाणार असल्याचे सांगितल्यानंतर ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा फेरीवाल्यांवर वळवला आहे. ठाण्यातील खोपट आणि इतर परिसरात मासळी विकणार्या विक्रेत्यांना आज मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. ठाणे आणि कोलबाड परिसरातील स्थानिक कोळी समाज आहे, त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मनसेची आहे. मासे विक्री करणार्या आगरी कोळी बांधवांना परप्रांतिय मासे विक्री करणार्यामुळे त्रास होत असल्याची आणि त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार मनसेकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार शुक्रवारी शहराच्या विविध भागात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून परप्रांतिय मासे विक्री करणार्यांना मनसे स्टाईलने चोप देण्यात आला. कोलबाड भागातील आगरी कोळी समाजातील मासे विक्रेत्यांना या परप्रांतिय मासे विक्री करणार्यांचा त्रास होत होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या मासे विक्री करणार्याना येथून पिटाळू लावण्यात आले आहे. शिवीगाळ करत मारहाण करणारे मनसे कार्यकर्ते स्थानिक आहेत, मात्र त्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत.
स्थानिकांना मिळावी जागा
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी आपल्या स्टाइलने आंदोलन केले. रेल्वे स्टेशनच्या आसपास 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे मनसेला आणखीच बळ मिळाले आहे. कोलबाड परिसरातील रस्त्यांवर अनेक मच्छी विक्रेते बसतात. यातील बहुतेक मच्छी विक्रेते हे परप्रांतीय आहेत, असा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ठाणे आणि कोलबाड परिसरातील स्थानिक कोळी समाज आहे, त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मनसेची आहे.