ठाणे : मराठा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे यंद प्रथमच कळवा, खारीगाव, पारसिक नगर, विटावा, गणपतीपाडा तसेच कळवा पूर्व या विभागात किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना तसेच नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे किल्ले कळावेत. तसेच आपली संस्कृती जपली जावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बालवीर मित्र मंडळ, विटावा, द्वितीय क्रमांक सृष्टी टॉवर, शास्त्री नगर, तृतीय क्रमांक साईबाबा मित्र मंडळ, कळवा यांस मिळाला आहे. गडकिल्ल्यांचे अभ्यासक अभिषेक गोळे यांनी किल्ला स्पर्धला पंच म्हणून लाभले होते.
27 मंडळांनी घेतला भाग
मराठा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित किल्ला स्पर्धेत विविध विभागातून 27 मंडळांनी भाग घेतला होता. या किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सुहास खामकर यांच्या हस्ते रोख रक्कम तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. खामकर हे 9 वेळा भारत श्री राहिलेले आहेत. तसेच नुकत्याच हाँगकाँग येथे झालेल्या मी. ऑलेंपिया स्पर्धेत त्यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमात भारत श्री. प्रशांत चव्हाण, कराटे मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट असलेले, 4 वेळा भारत श्री ’किताब मिळवलेले नंदकिशोर शिंदे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. माधव मुगले, नगरसेवक मुकुंद केणी, नगरसेविका अपणार्र् साळवी, माजी नगरसेविका मनाली पाटील, ठाणे परिवहन मंडळ सदस्य तकी चेऊलकर, अपोलो जिमचे संस्थापक तसेच ठाणे जिल्हा शरीर सौष्ठाव संघटनेचे अध्यक्ष कमलाकर पाटील, शिवसेना विभागप्रमुख विजू शिंदे, पत्रकार दीपक सोनवणे, पत्रकार ज्योती चिंदरकर, अशोक घाग या मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध शिव व्याख्याते नवनीत यशवंतराव हे निवेदक म्हणून लाभले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पराग मुंबरकर, सहसचिव वीरेंद्र परकळे, खजिनदार संतोष पालांडे तसेच त्यांच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली.