ठाण्यात साहित्यिक आनंद मेळावा

0

ठाणे : ठाण्यातील बाल विद्यामंदिर शाळेच्या सभागृहात वागळे इस्टेट येथे साहित्यिक आनंद मेळावा उत्साहात पार पडला. या काव्य सोहळ्यात साहित्यिकांनी एकमेकांचे विचार जाणून घेऊन साहित्याचा निखळ आनंद मिळावा, साहित्यिक चर्चा व्हावी, विचारांचे आदान-प्रदान व्हावे आणि त्यातून एक साहित्य विषयक चळवळीचे वातावरण निर्माण व्हावे ह्या उदेशाने हा साहित्य मेळावा आयोजित केला होता.

कालिदास प्रतिष्ठानचे (पुणे) संस्थापक ज्येष्ठ, लेखक, कवी संपादक, प्रकाशक आप्पा श्री. वी. ग. सातपुते यांचे स्नेही लेखक, कवी आणि ठाणे परिसरातील काही कवी, लेखक मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला संगीतकार आनंद पेंढारकर, जीवनविद्या मिशनचे नामधारक रमेश मातेले हे मान्यवर साहित्य मेळाव्यात व्यासपीठावर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, लेखणी व पुस्तकपुष्प देऊन या दोघांचा सत्कार आप्पा वी. ग. सातपुते यांनी केला. भावे यांनी आधी आप्पासाहेब सातपुत्यांचा सत्कार केला. या मेळाव्याची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी कवी भाव्यांनी गणेश वंदना तसेच स्वागत गीत गायले.