ठिंबक नळ्या चोरतांना चोरट्यांना रंगेहाथ पकडले

0

साक्री । साक्री तालुक्यातील ऐचाळे येथील शेतातुन काल रात्रीच्या सुमारास ठिंबकच्या नळ्या चोरतांना चोरट्यांना शेतकर्‍यांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत अधिक माहिती अशी की, ऐचाळे येथे नामदेव दौलत बावीस्कर व राजेंद्र पुंजाराम पाटील यांचे गावालगत काळमदेव शिवारात शेत आहे. या शेतात कपाशी लागवड केली आहे. कपाशाच्या शेतात ठिबक नळ्या टाकलेल्या आहेत. काल रात्री एक ते दिड वाजेच्या दरम्यान शेतात चोर आल्याची बातमी भ्रमणध्वनी ने शेजारच्या शेतकरयाने कळवली.त्यावरून नामदेव बावीसकर व राजेंद्र पाटील यांनी शेताकडे धाव घेतली. त्यावेळी टाटा मॅकसीमो (छोटा हत्ती) (एम.एच.19-एस.8608) मध्ये सतर हजार रूपये किंमत असलेल्या दोन्ही शेतकर्‍यांच्या ठिबक नळ्या घेऊन पसार होताना रंगेहाथ पकडले. काल गाडीसह 4 लाख 20 हजाराचा माल व भैय्या रूका बावीसकर (वय-25) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत निजामपुर पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलिस सहाय्यक निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्ग दशनाखाली हे.कॉ.बहीरम करीत आहेत.