ठिकठिकाणी शांतता समितीची बैठक

0

पाळधी/ वरणगाव । आगामी काळात गणेशोत्सव, बकरी ईद सारखे सण उत्सव येत असून या काळात जातीय सलोखा टिकून शांतता प्रस्थापीत करण्यासाठी समाजबांधवांनी प्रयत्न करावे तसेच सण उत्सव साजरे करतांना एकता कायम ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. पाळधी गणेशत्सव निमित्त शांतता कमेटीची सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्य मुकूंद नन्नवरे यांनी मनोगत व्यक्त करतांना सर्वधर्म समभाव कायम ठेवा असे सांगुन गावाची सर्वधर्म एकता कायम असून याचे श्रेय ना.गुलाबरावजी पाटील यांना जात असल्याचे सांगितले. तसेच धरणगांव पो.स्टेचे पीआय बाळू सोनवणे यांनी उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

पाळधीत यांची उपस्थिती ः यावेळी पाळधीचे सरपंच संजु देशमुख, शरद कासट, साहेबराव पाटील, आधार पाटील, एपीआय देशमुख, राजेंद्र पाटील, गोपाल सोनवणे, भुषण महाजन, दिपक श्रीखंडे, अरुण पाटील, भगवान धनगर, शरीफ देशपांडे, युवासेना शहर प्रमुख, आबा माळी, प्रमोद परदेशी, हर्षल पाटील, मुकेश भोई, सोनार सर, पंढरीनाथ ठाकूर, गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वरणगाव येथे बैठक
पोळा, बकरी ईद, गणेशोत्सव, दुर्गा देवी आदी सण आहेत. या काळात गावात शांतता व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन पोलीस उपअधिक्षक बच्चन सिंह यांनी वरणगाव पोलिस स्टेशनच्या सभागृहात शांतता कमेटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष नेवे, पोलिस निरीक्षक अशोक कडलग, एपीआय राहुल वाघ, एपीआय आढाव, उपनिरीक्षक निलेश वाघ, नगरसेविका रोहीणी जावळे आदी उपस्थित होते.

अफवा पसरवु नये
बच्चन सिंह म्हणाले की, सण उत्सव कार्यकाळात हिंदू- मुस्लीम बांधवांनी एकमेकांचे सहकार्य करुन उत्सव शांततेत पार पाडावा याकरीता मुस्लीम बांधवांनी नमाजाचा वेळ ठरवावा असे सुचीत केले. कोणीही अफवा पसरवू नये आणि अफवावंर नागरीकांनी विश्वास ठेवू नये, गणेश उत्सव हिंदू बांधवांचा पवित्र उत्सव असून अश्लील गाणे वाजवू नये ही आपली संस्कृती नाही. उत्सवात डिजेला बंदी आहे.

गणेश मंडळांना तंबी
प्रास्तविक सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी केली. यावेळी के.बी. काझी, सुधाकर जावळे, नामदेव मोरे, साजीद कुरेशी, सुनील काळे, अल्लाउदीन शेठ, मका शेठ, शामराव धनगर, बबलू माळी, गणेश धनगर, उत्तम भोई, राजेंद्र गुरचळ, सविता माळी, हेमलता सोनवणे, इफ्तेखार मिर्जा, बापू जंगले यांसह परिसरातील पोलिस पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते. त्यांना गणेशोत्सव काळात शांतता ठेवण्याची तंबी देण्यात आली.