ठिबक सिंचनमधील भ्रष्टाचार थांबवा

0

गडकरींनी मंत्र्यांना सुनावले

नागपूर : ठिबक सिंचन योजनेतील भ्रष्टाचार तातडीने थांबवा, शेतकर्‍यांच्या हाती अनुदान पोहोचेपर्यंत काहीच शिल्लक राहत नाही, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुनावले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्रीही उपस्थित होते. नागपूरमध्ये ऑरेंज फेस्टीव्हलचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमात नितीन गडकरींनी मंत्र्यांना अशाप्रकारे समज दिली.

ऑरेंज फेस्टीव्हलला पर्यटन विभागाची मदत
गडकरी म्हणाले, ठिकब सिंचन योजनेसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. मात्र ठिबक सिंचन करणार्‍या कंपन्या 10 रुपयांची वस्तू 20 रुपयांना विकतात. यात शेतकरी भरडले जातात. मुख्यमंत्र्यांनी आता या योजना थेट बँकेशी लिंक करण्याचे नियोजन केले आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना फायदा होईल, असेही गडकरी यांनी सांगितले. ऑरेंज फेस्टीव्हलला यापुढे राज्याचा पर्यटन विभाग मदत करेल. अशी घोषणा याच कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.