ठिबक सिंचनामुळे जगभरात जळगावचे नाव-शरद पवार

0

जळगाव : देशात ६० टक्के शेती ही कोरडवाहू आहे. शेतीसाठी पाण्याची गरज ओळखून पाण्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. यासाठी ठिबक तंत्रज्ञान महत्वाचे आहे. जळगावच्या जैन इरिगेशनने ठिबक तंत्रज्ञानात क्रांती करुन जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. पाण्याचे वाढते महत्व लक्षात घेता शेतीसाठी ठिबकमधील पायाभूत कामगिरीमुळे जळगावचे नाव देशातच नव्हे तर जगात पोहचले आहे, असे प्रतिपदान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.

एमआयडीसी भागात रमेश पाटील यांच्या ठिबक साहित्याच्या फॅक्टरीचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पक्षाचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरलाल जैन, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.