दीपनगरमधील प्रकार ; ठेकेदारासह दोघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ : दीपनगर औष्णिक वीज केंद्रातून दगडे उचलण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराच्या ट्रॅक्टरमध्ये दगडांच्या खाली नऊ हजार रुपये किंमतीचया कोळश्याची चोरी होत असल्याचा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात शु्क्रवारी रात्री राहुल इंगळे व काशिनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोळसा चोरीसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.