ठेकेदाराच्या दुर्लक्षितपणामुळे कामगाराचा मृत्यू !

0

भिवंडी :  पिंपळास येथील भुमी वर्ल्ड बी – २ येथे गोदामाच्या प्लास्टरचे काम सुरु असताना मजूराच्या जिवितास धोका पोचू नये यासाठी कोणतीही सुरक्षा पुरवली नसल्याने परांतीवरून पडून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी लेबर ठेकेदारावर मजुराच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याच्या कारणावरून कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सोनू प्रकाश कुशवाह (३५) असे बांधकामाच्या परांतीवरून पडून मृत्यू झालेल्या मजुरांचे नांव आहे.प्लास्टरचे काम सुरु असताना लेबर ठेकेदार राफे खुर्शीद अंसारी (३२ रा. निजामपुरा ) याने मृत मजूर सोनू याच्या जीविताच्या सुरक्षेसाठी हेल्मेट ,शेफ्टी बेल्ट,लाकडी परांची , जाळी आदी साहित्य पुरवले नाही. त्यामुळे काम सुरु असताना सोनूचा पाय घसरून तो जमिनीवर पडल्याने त्याच्या डोक्याला ,पाठीवर गंभीर दुखापती होवून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.पोलीस तपासात लेबर ठेकेदार राफे याने दुर्लक्षितपणा केल्याने सोनूचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास पोह.ज्ञानेश्वर शिंदे करीत आहे