शिंदखेडा । शहरातील भगवा चौक ते स्टेशनरोड पर्यंतच्या रस्त्याचे काम बोगस झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणातील ठेकेदार अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले मात्र चौकशी होवून दोषींवर कारवाई करण्यात आली नसल्याने युवकांनी पुढाकार घेत रास्तारोको केले. या रास्ता रोकोला केला. रास्तारोको करणार्या आंदोलकांना बांधकाम विभागाने दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. शिंदखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे 95 लाख रुपये खर्च करुन भगवा चौक ते स्टेशन रोडपर्यंतचा रस्ता तयार करण्यात आला. मात्र या कामासाठी अंदाजपत्रक आणि तांत्रिक मंजूरी सदोष पध्दतीने घेण्यात आली.
देखरेख ठेवण्यात आले नाही
तसेच रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरु असतांना योग्य ती देखरेख ठेवण्यात आली नाही. गुणवत्ता नियंत्रक विभागाने केलेल्या तपासणीनुसार सदर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. रस्ते कामातील दोषींवर दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल असे बाधंकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले. माजी अभियंता, सहाय्यक अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील सदोष तांत्रिक मंजुरी देणार्या संबंधीत अधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही साबांच्या अधिकार्यांनी सांगितले. रास्ता रोकोचे नेतृत्व रोहित पाटील, योगेश बोरसे, नंदू पाटील यांनी केले