जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांचा खळबळजनक आरोप
जळगाव– मागील सरकारने राबविलेली जलयुक्त शिवार योजना शेतकर्यांच्या हिताची आहे.खरे तर ही योजना लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा होती.मात्र ठेकेदारांना ही योजना दिल्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा खळबळजनक आरोप जलतज्ज्ञ तथा मॅगेसेस पुरस्कार प्राप्त राजेंद्र सिंह यांनी केला.पाण्याच्या नावावर ठेकेदारांनी पैसे कमावले असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान,महाविकास आघाडी सरकारने ही योजना पूर्ववत करुन सुसूत्रता आणावी अशी अपेक्षा देखील राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
मॅगेसेस पुरस्कार प्राप्त तथा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह हे जळगावात आले होते.यावेळी त्यांनी जिल्हा पत्रकार संघात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात पाण्याची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे.देशावर पाण्याचे मोठे संकट येणार असून केवळ पाण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता नाकारता येणार नाही अशी भिती राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केली.
हवामानानुसार पिके घ्यावीत
देशात मानवमिर्मित पाण्याचा दुष्काळ आहे. त्यामुळे केवळ पाण्यावर आधारित पिके न घेता आता हवामानानुसार पिके घ्यायला हवीत असे आवाहन देखील राजेंद्र सिंह यांनी केले. तसेच शास्वत विकास व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गंगा नदीच्या सफाईसाठी 20 हजार कोटींची उधळपट्टी
पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीच्या सफाईसाठी 20 हजार कोटींची उधळपट्टी केली असल्याचा आरोप जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केला.अलकनंदा आणि मंदाकिनी या नद्यांवर चार बांध बांधले जात आहेत.त्यामुळे गंगेचे प्राकृतिक स्वरुप बदलण्याची शक्यता आहे.तसेच मुळ स्त्रोत नष्ट होत असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेस जलरक्षक शिवाजी भोईटे,प्रतिभा शिंदे,दिलीप शिरुडे,जेष्ठ पत्रकार अनिल पाटील उपस्थित होते.