ठेवीदारांचा पैसा बुडवणार्‍यांची खैर नाही

0

भुसावळ । कष्टाने पै अन् पै जमवून पतसंस्थेत ठेवलेल्या ठेवीदारांचा हिरमोड होणार नाही यासाठी सहकार विभाग कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ठेवीदारांच्या हा हक्काचा पैसा आहे, तो कुणाच्या बापाचा नाही त्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम ही मिळणारच असल्याचे सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या खास शैलीत सांगितले. जनशक्ती प्रतिनिधीने नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ठेवीदारांना मिळणार होत्या त्या संदर्भात काय झाले या प्रश्‍नावर ते बोलत होते. ते म्हणाले की, चंद्रकांत हरी बढेंसारख्या लोकांना आतमध्ये जाण्याची वेळ आली त्यामुळे अनेकांची आता ईडीमार्फत चौकशी होणार आहे. पैसा बुडवणार्‍यांची आता खैर नाही, ठेवीदारांनी संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी प्रसंगी केले.