भुसावळ। तालुक्यातील अडचणीत असलेल्या पतसंस्थांच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळाव्यात म्हणून जनसंग्राम संघटनेच्या ठेवीदारांनी तालुका सहाय्यक निबंधक आर.आर. पाटील यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, महिनाभरात धनादेश देण्याचे आश्वासन मिळाल्याने ठेवीदारांनी सुटकेचा श्वास घेतला.
एकूण ठेवींची 25 टक्के रक्कम मिळणार
जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे, डी.टी. नेटके, डॉ. दिलीप पाटील, यशवंत गाजरे, निर्मला भंगाळे, वसुंधरा पाटील यांच्या नेतृत्वात तालुक्यातील 17 विविध पतसंस्थांच्या ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. एकूण ठेवींच्या 25 टक्के रक्कम वसुलीच्या प्रमाणात येत्या 12 सप्टेंबर रोजी धनादेशाद्वारे अदा करण्याचे निबंधकांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, येत्या 12 सप्टेंबर रोजी तालुक्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक कार्यालयात दुपारी 1 वाजता एकत्र येण्याचे ठरविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी सहाय्यक निबंधक आर.आर. पाटील, सहकार अधिकारी एस.जी. दराडे, आर.पी. निकाळे, नंदू वाघ, मनोज चौधरी यांसह मधुकर भिरुड, अलका चौधरी, निता भिरुड, आशा कोल्हे, एकनाथ भंगाळे, विजय देशमुख, शोभा बैतुले, प्रदीप सोनवणे, नरेंद्र कोल्हे, उध्दव भिरुड, मोहन करांडे आदी उपस्थित होते.