ठेवीदारांनी घातला सहाय्यक निबंधकांना घेराव

0

यावल। तालुक्यातील विविध 21 पतसंस्थांतील ठेवी परत करण्याची कोणतीच पाऊले उचलली जात नसल्याने जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या ठेवीदारांनी तालुक्याचे सहाय्यक निबंधक टी.एस.लाटणे यांना घेराव घातला. जिल्ह्यातील पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी डिसेंबर 2017 ही डेडलाईन असतांना यावल तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयाकडून गेल्या आठ महिन्यात एकाही ठेवीदाराला दमडी पण वाटप न झाल्याचे ठेवीदारांनी विचारलेल्या माहितीतून पुढे आल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त करत घेराव घातला. जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सुमारे 75-80 ठेवीदारांनी घेराव आंदोलन करीत डीडीआर म्हणतात तसे यावल तालुक्यातील किती व कोणत्या ठेवीदारांना ठेवींचे पैसे मिळाले त्याची नावे व यादी जाहीर करण्याची मागणी ठेवीदारांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली. यावेळी गेल्या आठ महिन्यात कोणत्याही ठेवीदाराला ठेवी परत मिळाल्या नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने ठेवीदारांनी सहकार विभागाच्या वसुली पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

26 सप्टेंबर रोजी थेट ठेवी हातात देण्याचे आश्वासन
घेराव आंदोलनात विवेक ठाकरे यांच्यासह डी.टी.नेटके, यशवंत गाजरे, रमेश बोंडे, विजय देशमुख, बी.डी. पाटील, मधुकर जगताप, पद्माकर गुरव, डॉ.दिलीप पाटील, वासुदेव वाणी, जानकीराम कोल्हे, बळीराम वाघुळदे, काशिनाथ धांडे, पुष्पलता वाघुळदे, विमल महाजन, सुचित्रा जावळे, निशा कोल्हे, नलिनी झांबरे, नलिनी भंगाळे, शांताबाई वाणी आदी ठेवीदारांनी सहभाग घेतला.

4 सप्टेंबर रोजी इशारा आंदोलन
महिनाभरात ठेवी परत करा अन्यथा जेलभरो असा ईशारा देणारे आंदोलन येत्या 4 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 2 यावेळेत जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.जळगाव जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांनी उपस्थित राहावे असे आवाहान जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.