जळगाव । ठेवीच्या रकमाची सातत्याने मागणी करणार्या आदेश असलेल्या ठेवीदारांना ठेवीच्या रकमा मोठ्या प्रमाणावर वसुली होत असतांना न देण्याच्या भ्रष्ट प्रवृत्तीला सहकार विभागाचे भ्रष्ट अधिकारी जबाबदार असून मोठ्या प्रमाणावर कर्ज वसुलीची आकडेवारी दाखवत स्वतःची पाठ थोपवून घेत आहे. मात्र 2007 पासून सातत्याने अर्ज करून पाठपुरावा करून ठेवीच्या रकमा मागणार्या ठेविदारांना कष्टाचा रकमा क्रांती दिनी मिळावी, अशी मागणीसाठी भुसावळ शहरातील ठेवीदार बुधवारी 9 ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन जळगाव जिल्हा महिला ठेवीदार कृती समितीतर्फे करण्यात आले.
सहकार विभागाकडून पतसंस्थेच्या जमा झालेल्या व वाटप केलेल्या 850 कोटींच्या रकमा कोणाला वाटप व कशापद्धतीने झाल्या याची केंद्राच्या दक्षता, भ्रष्टाचारी विरोधी पथक सी.बी.आय, एन.आय.ए. व वरीष्ठ यांनी संबंधीत विभागाची सखोल चौकशी केली तर लक्षात येईल. जिल्ह्यातील सहकारी संस्था ठेवीदार व त्यांच्या कुटुंबियांचे शोसण करीत असून ठेवीदारांचे कुटूंब उध्वस्त होत आहे तर काहींना आत्महत्या करण्याची वेळा आली आहे. याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करून जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. प्रत्येक ठेवीदाराचा कष्टाचा पैसा जमा करून पतसंस्थांमध्ये ठेवीस्वरूप गुंतवणूक केलेल्या रकमांबाबत मुदत पूर्ण झाल्यानंतरही भ्रष्ट पतसंस्थाचालक रकमा परत करत नसल्याने ठेवीदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे शिवाय पतसंस्था चालकांवर नियंत्रण ठेवून असलेला सहकार विभागही मूग गिळून गप्प असल्याने भुसावळ शहरातील ठेवीदार यांनी ‘दैनिक जनशक्ति’शी बोलतांना सांगितले.
महिला ठेवीदारांच्या या आहेत प्रमुख मागण्या
2007 पासून सहकार विभाग व जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलेल्या निवेदन व आंदोलना प्रंसगीच्या लेखी आश्वासनावर कोणतीच अमंलबजावणीत्मक कारवाई सहकार विभागाने केली नसून त्या सर्व निवेदन व आदेशाच्या आढावा-मर्यादित कालावधीत घेण्याचे व अमंलबजावणीचे आदेश द्यावे, मुख्यमंत्री लोकशाही दिनातील अर्जदारांना आजपर्यंत कोणतीच रक्कम देण्यात आली नाही त्या रक्मा व्याजासह देण्याचे आदेश व्हावे. लोकशाही दिनातील अर्जदारांना त्यांच्या ठेवीच्या रक्मा व्याजासह देण्याचे आदेश व्हावे. संबंधीत पतसंस्थेच्या चेअरमन सचांलकांकडील जबाबदारीच्या रक्कमा तात्काळ वसूलीचे नियोजन मर्यादित कालावधीत व्हावे. काळा हनुमान, जयमातादी, सतोषीमाता, विठ्ठल रखुमाई, बढे, स्वामी नारायण, सप्तश्रृंगी, तापी सावदा, सदगुरुकृपा, स्वमी समर्थ, आनंद अर्बन, जय श्रीराम, जळगाव जिल्हा मेडीसीन, खान्देश पीपल्स, महेश मर्चंट, मगंलदिप, लक्ष्मीनारायण, कुबेर, जनता अर्बन व धनश्री अर्बन या सस्थांच्या वारंवार तक्रारी देऊन सुद्धा का न्याय ठेवीदारांना न्याय मिळावा, आजच्या क्रांती दिनी आमच्या विरल मागण्या संदर्भात ठोस आदेश देऊन न्याय द्यावा.
क्रांती दिनी तक्रारीची दखल घेण्याची मागणी
मंगळवारी त्यांच्या नेतृत्वाखालील ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले. अगस्ट क्रांतीदिनी आमच्या तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणी ठेवीदारांनी प्रसंगी केली. महिला ठेवीदार कृती समितीच्या महिला अध्यक्षा संध्या चित्ते, प्रभूदिनी बेंडाळे, शालीनी ढाके, ताराबाई माळी, सुनिता भंगाळे, बळीराम फिरके, चमेलीबाई ढाके, गोविंद झोपे, भागवत बेंडाळे, अशोक ढाके, प्रमोद पाटील, यशवंत अढळकर, प्रविणसिंग पाटील यांच्यासह अन्य ठेवीदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले.