ठेवीदाराची फसवणूक : भुसावळातील काळा हनुमानच्या अभय राजेंसह चौघांविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ- ठेवीची मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या भुसावळ शहरातील काळा हनुमान अर्बन को.ऑपरेटीव्ह सोसायटीचे चेअरमन अभय राजेंसह चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार अनिता प्रकाश झांबरे यांनी काळा हनुमान सोसायटीत दोन लाख 10 हजारांची मुदत ठेव ठेवली होती. मुदत ठेवीनंतर ही रक्कम तीन लाख 74 हजार 670 रुपये झाली मात्र मुदतीनंतर आरोपींनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी चेअरमन अभय राजे, जगमोहनसिंग नरेंद्रसिंग छाबडा (टिंबर मार्केट, भुसावळ), संचालक शिल्पा रजनीकांत खेडूलकर (न्यू एरीया वॉर्ड, भुसावळ), कार्यकारी संचालक संजय चांगदेव वारके (प्रोफेसर कॉलनी, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.