ठेवी द्या;अन्यथा ईडीच्या कारवाईत तुरुंगात जावे लागेल

0

जळगाव । जिल्ह्यातील संस्थाचालक सक्त वसुली संचालनालय (ईडी) यांच्याकडून केल्या जाणार्‍या चौकशीच्या रडावर आहेत. चौकशी दरम्यान ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ परत करून त्यांच्या तक्रारी निकाली काढा अन्यथा संस्था चालकांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेववी, असा इशारा जनसंग्राम ठेवीदार संघटनेच्या बैठकीतून देण्यात आला. रविवारी दुपारी 1 वाजता जनसंग्राम संघटनेच्या ठेवीदारांची बैठक शहरातील संत गाडगेबाबा उद्यानात संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या आदेशानुसार समन्वयक डी.टी.नेटके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

पतसंस्थांची चौकशी होणार…
या बैठकीत गेल्या आठ ते अकरा ऑगस्ट दरम्यान रावेर, यावल, भुसावळ व जळगाव तालुक्यातील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून त्या-त्या तालुका सहाय्यक निबंधक यांना घेराव घालण्यात आला होता. या दरम्यान, पतसंस्थानिहाय ठेवदारांच्या याद्या सहकार विभागाकडे देण्यात याव्यात असे संघटनेला सुचविण्यात आल्याने याद्यांचा पाठपुरावा करण्यासाठी बैठकीत कारवाई करण्यात आली. बैठकीत डी.टी.नेटके यांनी ठेवीदारांनी वारंवार तक्रारी केल्याने जनसंग्राम संघटनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील पतसंस्थांची ईडीकडून चौकशी होणार असल्याची माहिती दिली. याचा अहवाल पाठविणेसाठी नाशिक विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा उपनिबंधकांना आदेश दिलेले आहेत.

यांची होती उपस्थिती
जिल्ह्यातील संस्थाचालकांना ठेवीदारांचया ठेवी परत केल्याशिवाय गत्यंतर नाही. गुंतवणुकीत ठेवीदारांचे हितसंरक्षण केले नाही म्हणून संस्थाचालकांचे सहाराचे सुब्रोतो रॉय, पीएसीएलचे भांगो, सुमृध्द जीवनचे महेश मोतेवार, केबीसी घोट्याचा सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण, बीएचआर पतसंस्थेचे अंकल रायसोनी व इतर 13 संचालक यांच्यासारखे तुरूंगात हाल जोतील असा इशारा देत ठेवीबाबत उपाययोजना करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. बैठकीत यशवंत गाजरे, सुरेश भोगे, नुतन अविनाश काळे, सुवर्णा भंगाळे, प्रभावती गिरधर पाटील, लता धनगर, सुलोचना खाचणे, धनराज सुर्यवंशी, गोविंदा परदेशी, धर्मराज झणझने, पी.के.अमृतकार, आर.आर.पाटील, मधूकर जगताप, शांताराम सोनार, कमला शर्मा यांच्यासह असंख्य ठेवीदार बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.