ठोकमानधनाच्या कर्मचार्‍यांना किमान वेतनात समाविष्ट करण्याची मागणी

0

नवी मुंबई । महापालिका सर्वसाधारण सभेत ठोकमानधनावरील 603 कर्मचार्‍यांकरिता किमान वेतन प्रस्तावास मंजुरी देण्यात आली असल्याने ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. ठोकमानधनावरील कर्मचार्‍यांना यापुढे देण्यात येणारे किमान वेतनही कमी असून ते 25 ते 30 हजार इतके करण्याची गरज असल्याची मागणी करण्यात आली आहे.किमान वेतन प्रस्तावात शिक्षण विभागातील ठोकमानधनावरील प्राथमिक माध्यमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, मदतनीस व आरोग्य विभागातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांना समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी सिद्धाराम शिलवंत(शिक्षक-प्रतिनिधी),शाखाप्रमुख महेश कोटीवाले मनपा आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

कर्मचार्‍यांमध्ये रोष
ठोकमानधनावर विविध विभागात 876 कर्मचारी कार्यरत आसताना केवळ 603 कर्मचार्‍यांचा प्रस्ताव आणणे योग्य नाही. तरी या सदर प्रस्तावात महापालिका आस्थापनेवर ठोकमानधनावरील कार्यरत आसलेल्या शिक्षण विभागातील ठोक मानधनावरील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, मदतनीस व आरोग्य विभागातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांना किमान वेतन या प्रस्तावातून वगळण्यात आले आहे. सदर प्रस्तावातून वगळण्यात आलेले ठोक मानधनावरील कर्मचारी सुद्धा कायमसेवेतील कर्मचार्‍याप्रमाणे काम करत आहेत. तरी या कर्मचार्‍यांना किमान वेतन या प्रस्तावातून वगळण्यात आले आहे.