जळगाव। रेमंड चौफुलीजवळ विना परवाना अवैधरित्या वाळुवाहतुक प्रकरणी शनिवारी चालकास न्यायाधीश एन. के. पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर जामीसाठी अर्ज दाखल केला असता तो न्यायायलयाने फेटाळून लावला आहे.
तहसिलदार अमोल निकम हे जामनेर येथील गोदाम तपासणी नंतर जळगावकडे परतत असतांना शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता त्यांना रेमंड चौफुलीजवळ अवैधरित्या वाळु वाहतुक करतांना रेमंड चौफुलीजवळ डंपर (एमएच.04.सीपी.9398) वरील चालक सुनिल गोपाळ पाटील (वय-26.रा. भोकनी बांभोरी) आढळून आला. तहसिलदारांनी परवाना मागितल्यानंतर सुनिल पाटील याने परवाना दाखवला मात्र, परवाना अवैध निघाल्यानंतर डंपरसह चालकावर कारवाई केली. त्यानंतर डंपर व चालक सुनिल पाटील याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. यातच शनिवारी दुपारी चालक सुनिल गोपाळ पाटील यास एमआयडीसी पोलिसांनी न्यायाधीश एन.के.पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्याला न्या. पाटील यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी कामकाज पाहिले.