जळगाव । मुंबई-नागपुर एशियन महामर्गावर जळगाव शहरात रिलायन्स पेट्रोलपंप मिल्लत हायस्कुल समोर सुसाट वाळू डंपर चालकाने कारला समोरुन धडक दिल्याने कारचा समोरील भागाचा चुराडा झाला. कारमधील एअरबॅग्ज वेळीच उघडल्याने चालकासह सोबत बसलेल्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. औद्योगीक वसाहत पोलिसांत डंपर चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डंपर चालकाविरूध्द गुन्हा दाखल
शहरातील मोहाडीरोड विनोबानगर भागातील रहिवासी दिपक शिवचंद लढ्ढा (वय-46,) व मंगल अस्थिमल शर्मा दोघेही त्यांच्या ताब्यातील हुंडाईव्हर्ना कार क्र (एमएच.19.बीयु.8704) या कारने अजिंठा चौकातून इच्छादेवी चौका कडे येत असतांना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास समोरुन सुसाट वेगात येणार्या वाळू डंपर क्र.(एमएच.19 झेड. 9992) वरील चालकाने समोरुन धडक दिली. रिलायन्स पेट्रोलपंपा समोर झालेल्या या अपघातात व्हर्नाकारच्या समोरील भागाचा चुराडा झाला, कारमधील दोघांना मात्र किरकोळ दखापती होवुन त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. जखमी दिपक शिवंचद लठ्ठा यांच्या तक्रारीवरुन औद्योगीक वसाहत पोलिसात डंपरचालका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन तपास पोलिस नाईक प्रकाश निंबाळकर करीत आहे.