जळगाव। कानळद्या रस्त्याकडून येणार्या भरधाव डंपरने युवराज मन्साराम निकम वय-56 रा. मुक्ताईनगर या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता शिवाजीनगरातील एस.के. ऑईल मील जवळ घडली. या घटनेनंतर डंपर चालक फरार झाला असून निकम यांना खाजगी रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. युवराज निकम यांच्या फुले मार्केटमध्ये कटलरीचे दुकान आहे.
या दुकानावर जाण्यासाठी ते दुचाकी क्रं. एमएच.19.सी 4524 ने जात असतांना शिवाजीनगरातील एस.के ऑईलजवळ कानळदा रस्त्याकडून भरधाव वेगाने येणार्या डंपरने निकम यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात ते लांब फेकले गेले. हा अपघात झाल्यानंतर डंपर चालकाने मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. याच वेळी रस्त्याने येणार्या सलमान शेख शब्बीर शहा या रिक्षा चालकाने त्यांना गेंदालाल मिलमधील खाजगी दवाखान्यात नेले.